Ad will apear here
Next
विश्वेश्वर बँकेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश
पुणे : ‘दि विश्वेश्वर सहकारी बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश दिला असून, तो सर्व सभासदांच्या खात्यात जमादेखील करण्यात आला आहे’, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी दिली. बँकेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या वेळी बँकेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी, सभासद व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष मनोज साखरे आदी या वेळी उपस्थित होते.

‘मार्च २०१९ अखेर बँकेच्या ठेवी १५२३ कोटी रुपयांच्या असून, बँकेने ८५७ कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. या संपूर्ण वर्षांत बँकेचा एकूण व्यवसाय २३८० कोटी रुपयांचा झाला असून, बँकेला २९.०७ कोटी रुपये नफा झाला आहे,’ अशी माहितीही गाडवे यांनी दिली.  

या वेळी बोलताना श्रीराम आपटे म्हणाले, ‘चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बँकेने सिंहगड रस्ता शाखेत कॅश स्वीकारून एटीएमसारखे पेमेंट करणारे रिसायकलर मशीन ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे’.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZISCC
Similar Posts
दी विश्वेश्वर सहकारी बँकेचा सभासदांना दहा टक्के लाभांश पुणे : दी विश्वेश्वर सहकारी बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. बँकेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, त्यात ही घोषणा करण्यात आली.
साधा मुहूर्ताच्या ट्रेडिंगची सुवर्णसंधी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग केले जाते. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही एक पर्वणीच असते. यंदाही सात नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत मुहूर्ताचे ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी आहे. या वेळी कोणते शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरेल, याबाबत माहिती देत आहेत अर्थतज्ज्ञ डॉ
आत्ता कोणते शेअर घ्याल? मार्च २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीत गुंतवणूकही जास्त झाली आहे. यंदा पावसाळा उत्तम होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शेअर बाजारातील कोणते शेअर सध्या घेण्याजोगे आहेत, याबद्दल पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
गुंतवणुकीची सहा तत्त्वे चांगल्या प्रकारे गुंतवणूक होण्यासाठी प्रत्येकाने सहा तत्त्वे लक्षात ठेवायला हवीत. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या हीच सहा तत्त्वे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language